अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातही अन्न पदार्थांवरील भेसळीविरोधात छापेमारी सुरू आहे. दुध हा सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्यातील भेसळ हा गंभीर विषय बनलाआहे.दुधामध्ये रासायनिक पदार्थ मिसळून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांनी दुध भेसळीवर विशेष लक्ष केंद्रीत करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.