धाराशिव- दिवाळीच्या सणाला सुट्टी असल्याने तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आगामी येणाऱ्या नाताळाच्या सुट्ट्या आणि दीपावली सणाची मंदिरात होणारी गर्दी पाहता मंदिर संस्थांनी येणाऱ्या 31 जानेवारीपर्यंत मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज पहाटे एक वाजता तुळजाभवानीचे मंदिर भक्तांसाठी खुले केले जात आहे