धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य ड्रोन शो पार पडला. ३०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात श्री तुळजाभवानी देवी, मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरेचा हा संगम भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. धाराशिवमध्ये प्रथमच आयोजित झालेल्या या सोहळ्याने भक्तीचे अद्भुत दर्शन घडवले.