परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कपाशी, सोयाबीन, मका सह इतर पिकांचे मोठे नुकसान केले. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला, मात्र हाच परतीचा पाऊस तूर पिकांसाठी आता पोषक ठरला आहे. सध्या तूर पीक जोमात असून फुलारा अवस्थेत असल्याने तूर पीक लदबदले असल्याचे दिसत आहे. सोबतच काही ठिकाणी तर शेंगा लागल्या असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मात्र परतीच्या पावसाने जे नुकसान आहे ते थोडाफार का होईना भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.