यंदा मुक्ताईनगर तालुक्यात तब्बल तीन हजार हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान आता तूर काढणीला सुरुवात झाली असून, तुरीला चांगला भाव मिळत आहे, तसेच उत्पन्नातही वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.