वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन परिसरात हळद काढणीला सुरुवात झाली आहे. मागील वर्षी मे-जून महिन्यात लागवड केलेली हळद आता पूर्णपणे तयार झाली आहे. शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानच्या शेतातील हळद काढून तिची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.