वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी हळद काढणीला सुरुवात झाली आहे. शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थानच्या शेतातून हळद काढणीचा प्रारंभ झाला असून मागील काही दिवसांपासून काम सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम जाणवला असला तरी यंदा हळदीचे उत्पादन समाधानकारक होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिरपूर व परिसरात मोठ्या प्रमाणावर हळद लागवड करण्यात आली असून हे शेतकऱ्यांचे मुख्य वार्षिक पीक आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद काढली जात असून मजुरांकडून वेचणीचे काम सुरू आहे.