एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरद्वारे आयोजित रानभाजी महोत्सवाला चंद्रपूरकरांनी यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दररोज सरासरी एक लाख रुपये याप्रमाणे पाच दिवसांत पाच लाखांची आर्थिक उलाढाल महोत्सवादरम्यान झाली. यातून आदिवासी समुदायाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली.शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथे १८ जुलै रोजी रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन झाले होते.