चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरात पुन्हा एक टस्कर हत्ती दाखल झाला आहे. हा हत्ती सामदा-सोनापूर नदीमार्गे गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आला. सध्या या हत्तीने सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरातील जंगलात ठिय्या मांडला आहे.