परळी शहरातील बस स्थानकाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं. विशेष म्हणजे या बस स्थानकाच्या कामाचं आतापर्यंत चार वेळा भूमिपूजन करण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात काम सुरूच झालं नव्हतं. या गंभीर समस्येवर टीव्ही9 मराठीने वारंवार बातम्या प्रसारित केल्या. अखेर त्या बातम्यांचा इम्पॅक्ट दिसून येत असून परळी बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.