वाशिम शहरातील मंत्री पार्क भागात दोन वळूंची भरस्तत्यात झुंज सुरू असल्याचं पहायला मिळालं. यामुळे या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, अखेर स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत दोन्ही वळूंना वेगळे करून रस्त्याच्या बाजूला हाकलले.