राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेमधील सिनिअर केजीचे विद्यार्थी अभिज्ञा म्हस्के आणि कबीर उगले पुढे आले आहेत. या दोघांनी आपल्या गल्ल्यातील बचत केलेले पैसे पूरग्रस्तांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.