गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव परिसरातील एका शेतात बिबट्याची दोन लहान पिल्लं आढळून आली. शेतात ही पिल्लं दिसताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ही पिल्लं लहान असल्याने त्यांची आई म्हणजेच मादी बिबट आसपासच्या परिसरातच दबा धरून बसलेली असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.