पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये रात्री दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. जेरबंद झालेले दोन्ही बिबटे नर असून, एक बिबट्या सात वर्ष तर एक बिबट्या आठ वर्ष वयाचा आहे. या दोन्ही बिबट्यांची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीये.