पुण्याच्या शिरूर तालुक्यातील बुरुंजवाडी येथे रस्त्यालगत शेतात दोन बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्त्यांपर्यंत बिबटे पोहोचत असल्याने स्थानिकांची अस्वस्थता वाढली आहे.अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्यावर बिबट्याचे हल्ले वाढले आहे त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत शेतकरी करत आहे.