नाशिकच्या निफाड तालुक्यातील मुखेड येथे दोन बिबट्यांचा मुक्तसंचारामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास मुखेड-गोंडेगाव रस्त्यावर ऊस आणि द्राक्षाच्या बागेत दोन्ही बिबटे फिरताना काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात त्यांचे चित्रीकरण केले.