पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. यामध्ये एक नर आणि एक मादी बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही बिबट्यांना एकाच पिंजऱ्यात पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. दरम्यान, एकाच वेळी दोन बिबटे पिंजऱ्यात पकडले गेल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून, या बिबट्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. वन विभागाकडून दोन्ही बिबट्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू असून, नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.