जेवण करण्यासाठी गेलेल्या २ तरुणांना हॉटेलचे वेटर आणि हॉटेल मालकांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली. पुण्याजवळील मांजरी येथील हॉटेल हॅप्पी पंजाब येथील ही धक्कादायक घटना आहे. आशिष भगत आणि त्याच्या मित्राला हॅप्पी पंजाबच्या वेटर आणि मालकाने बेदम मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मारहाणी प्रकरणी चार जणाविरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल झालाय.