उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हिंगोली शहरातील गांधी चौकात शेतकरी कर्जमाफीच्या जीआरची होळी केली आणि त्यावर भाकरी थापत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आक्रोश आंदोलनाची दखल नाही घेतली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.