प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाकडून आपल्या बॅगांची तपासणी होत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. या तपासणीतून त्यांना काहीही आक्षेपार्ह सापडत नसल्याचे ते म्हणाले. बॅगांमध्ये फक्त दैनंदिन वापरातील कपडे असतात असे सामंत यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी असून, त्यांनी आपले कर्तव्य बजावून महाराष्ट्राला सत्य सांगावे, असेही ते म्हणाले.