ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुंबईत राहायला लाज वाटते, असे विधान केले आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईनेच मांजरेकरांना प्रसिद्धी दिली, त्यामुळे असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. नेत्यांना खूश करण्यासाठी अशी विधाने करू नयेत, असे आवाहन सामंत यांनी केले.