चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात उदय सामंत आणि वैभव नाईक यांची भेट झाली. कॉलेजपासूनचे मित्र असलेल्या या दोन्ही नेत्यांनी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. ही भेट केवळ मित्र म्हणून झाल्याचे त्यांनी नमूद केले.