शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. "जे आम्हाला 'नाचा नाचा' बोलत होते, ते आता 'छम छम' नाचत आहेत," अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.