सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणाच्या जलाशयात परदेशी प्रजातीच्या 'सकर' (हेलिकॉप्टर) माशाने उच्छाद मांडला आहे. मांगूर आणि तिलापियानंतर आता या नव्या संकटामुळे उजनीतील स्थानिक व गोड्या पाण्यातील देशी माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.