धाराशिवच्या उमरगा येथील स्ट्रॉंग रूमभोवती २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलासह स्थानिक पोलीस दल पहारा देत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वाढीव सुरक्षेची मागणी केली आहे. या निवडणुकीत रवींद्र गायकवाड, ज्ञानराज चौगुले आणि प्रवीण स्वामी यांसारख्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.