उमरगा तालुक्यातील डाळींब परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाची टीम बिबट्याच्या पायाचे ठसे तपासण्यासाठी दाखल झाली असून, ग्रामस्थ लवकर पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याची मागणी करत आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, बिबट्याच्या दहशतीने शेती कामांवर परिणाम होत आहे.