दोन दिवसापूर्वी मीरा रोड प्लेसन्ट पार्क येथोल डेकोरेशनचे सामान ठेवलेल्या शेडला आग लागली होती. त्यात मोठ्या प्रमाणात सामानाचे नुकसान झाले होते. त्याच अनुषंगाने अनधिकृत शेडवरती कारवाई करायला सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती क्र.६ मध्ये तोडकामाची मोठी धडक कारवाई करण्यात आली. प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी पोहोचून अनधिकृत बांधकाम निष्कासित केले आहे.