शिवसेना नेते संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. या पुस्तकावरुन सध्या वादंग सुरु आहे. यावर भाजपा नेत्यांनी टीका सुरु केली आहे. संजय राऊत स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगात गेले नाहीत तर घोटाळ्यात त्यांना अटक झाल्याची टीका शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी केली आहे. आता केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी तोंडसुख घेतले आहे. राऊत यांना स्वर्गात जायचे असेल तर त्यांनी चांगली भाषा वापरावी चांगले बोलावे असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.