संक्रांत सणानिमित्त हळदी कुंकवाचा सण साजरा केला जातो. मात्र यंदा अहिल्यानगरमध्ये एका वेगळ्याच भावनेने हळदी कुंकू साजरा झाला. देशाच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या वीर पत्नींसाठी खास हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.