मतदार राजा जागा हो- प्रगतीचा धागा हो... व एकच लक्ष - मताचा हक्क.. यांसारख्या अनेक घोषणा देऊन मतदार जनजागृती करण्यात आली. मालेगाव मनपा आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शाळांतील विद्यार्थी आणि मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान जनजागृती रॅली महानगर पालिका पासून, गूळ बाजार, नंदन टॉवर, संविधान चौक, दत्त मंदिर चौक, संगमेश्वर ते महात्मा फुले पुतळा ते रावळगाव नका पर्यंत एकत्रित रॅली काढली आणि मतदार जागृती करण्यात आली. मतदार राजा जागा हो- प्रगतीचा धागा हो व एकच लक्ष - मताचा हक्क यांसारख्या अनेक घोषणा देऊन मतदार जनजागृती करण्यात आली.