भंडारा जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला असला तरी पहाटेच्या गारव्यामुळे टरबूज पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील प्रगतशील शेतकरी अंकुश नंदनवार यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.