अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये आज एक वेगळाच शपथविधी पार पडला आहे. किड्ज पॅराडाईज शाळेत शालेय मंत्रीमंडळाचा अनोखा आणि आकर्षक शपथविधी सोहळा रंगला.अगदी खऱ्या मंत्रिमंडळ शपथविधीप्रमाणेच संपूर्ण सोहळा दिमाखात पार पडला आहे. लोकशाहीचं प्रत्यक्ष शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी किड्ज पॅराडाईज शाळेत दरवर्षी स्कूल कॅबिनेटची निवडणूक घेतली जाते. तर नामांकन, प्रचार, मतदान, निकाल आणि अखेर मंत्रिमंडळ निवड अशा सर्व टप्प्यांमधून विद्यार्थी जातात.