कामावर असताना झालेल्या अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला उपचाराचा खर्च आणि नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी नातेवाईक व प्रहारच्या वतीने माढ्यातील महावितरण कार्यालयासमोर अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. अपंगत्व आलेल्या कर्मचार्याल रुग्णवाहिकेतून आणून स्ट्रेचरवर झोपवण्यात आले.