अहिल्यानगर : नवसपुर्तीचे अनेक प्रकार आहेत मात्र आदिवासी बांधवांची ही प्रथा मात्र अनोखी आणि थरारक आहे.. अर्धवट कापलेल्या माठात जंगली वनस्पती टाकल्या जातात आणि लाकडांवर तेलाची संततधार सोडून भिजवलेल्या या माठाला कठ्ठे असे म्हणतात. देवाच्या काठिची मिरवणूक मंदिराजवळ आली कि हे कट्टे पेटवले जातात. आणि धगधगणारे हे कठ्ठे मग गावातील एक एक जण उचलतो आणि डोक्यावर घेऊन देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा सुरू होते. अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी बिरोबा महाराजांची यात्रा भरते यावेळी योगायोगाने रविवारीच अक्षय तृतीया असल्याने काल रात्री हि अनोखी परंपरा साजरी केली गेलीय..