धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसाव गावामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे दीड एकर मध्ये पेरलेला कांदा हा अक्षरशः नासून गेला आहे. कांद्यासाठी झालेला खर्च सुद्धा न निघाल्यामुळे शेतकऱ्याने शासकीय मदतीची मागणी केली आहे. कांद्याला भाव नसल्यामुळे कांदा हा साठवून ठेवला होता परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.