हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.वादळी वारा आल्याने कापणीला आलेले धानपिक तसेच आंबा पिक आणि भाजीपाल्याच्या शेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याचा पारा 42 अंशांवर गेला असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना असह्य उकाड्यापासून मात्र दिलासा मिळाला आहे.