जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील 52 गावांतील सुमारे 1302 शेतकरी बाधित झाले असून तब्बल 500 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना तडाखा बसला आहे. मका, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी आणि बाजरी यांसारखी काढणीला आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहेत.