जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यात विशेषतः पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या फटक्यानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाने कापूसपिकाचे मोठे नुकसान केले आहे.