जळगावच्या एरंडोल तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने ५ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं.एरंडोल तालुक्यात ५२ गावांतील ५ हजार ८७२ शेतकरी बाधित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हातातोंडाशी आलेली गहू, मका व ज्वारी ही पिके आडवी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे एरंडोल तालुक्यातील एकूण पिकांपैकी सुमारे ३० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.