अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथील शेतकरी अंकुश दराडे यांनी आपल्या सुमारे दहा एकर शेतजमिनीत ज्वारीची लागवड केली होती. पीक चांगल्या अवस्थेत आले असून काढणीच्या टप्प्यात होते. मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण ज्वारीचे पीक जमिनीवर कोसळले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.