धाराशिव जिल्ह्याला सलग तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपलं आहे. वेगाचा वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने धाराशिवमध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद झाली आहे. त्यामध्येच अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने केळीची झाडं अक्षरश: मोडून पडली आहेत.