जळगाव जिल्ह्यात रात्री वादळी पावसासह गारपीट झाली. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यात अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला. पाचोरा तालुक्यातील सारोळा येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. कुऱ्हाड व बाळद भागातही बेमोसमी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.