अमरावती जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा 12 गावांना फटका बसला आहे. वादळ आणि गारपिटीसह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये 96 घरांचं नुकसान झालं असून 92 घरांची पडझड झाली आहे. तर जिल्ह्यातील 16 गावांमध्ये 25 हेक्टरवरील पपई,लिंबू ,संत्रा,केळी,आंबा टरबूज,मुंग तीळ पिकांचं नुकसान झालं आहे.