सांगली जिल्ह्यात मिरज पूर्व भागात काल वादळी वाऱ्यासह गारांचा प्रचंड पाऊस पडला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरज बेडग रोड वरील शाळूचे पीक अक्षरश भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. काढलेला शाळू भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे.