सलग दुसऱ्या दिवशीही भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाचा फटका रब्बी हंगामातील कापणीवर आलेल्या धान पिकांना बसला आहे.