धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाख्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे बागेतच द्राक्षे सडण्याची भीती असून द्राक्षला तडे जायला सुरुवात झाली आहे. द्राक्षाला तडे गेल्यास बाजार भावात 30 ते 40% नुकसान होते. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अगोदरच उत्पादनात घट, त्यानंतर अवकाळी पावसाचे दुहेरी संकट आले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला असल्याने सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.