हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात रात्री अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा यासह इतर पिकांना काहीसा फटका बसला आहे. तर आंबा बागेत फुलोऱ्याची गळ झाल्याने आंबा, गहू, हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.