विदर्भामध्ये सध्या सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने भंडारा जिल्हाच्या लाखांदूर परिसरात मोठी दाणादाण उडवली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका थेट लाखांदूर पोलीस स्टेशनला बसला असून,गेल्या ९० वर्षांपासून उभा असलेला पोलीस दलाचा मुख्य वायरलेस टॉवर वादळापुढे सपशेल कोलमडून पडला.या दुर्घटनेत पोलीस स्टेशनच्या छतावरील सोलर प्लेट्स चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्यरात्री अचानक आलेल्या वेगवान वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले.