गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावलीआहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.गोरेगाव तालुक्यातील हिरडामाहिली इथे नागपुरे यांच्या वाड्यात झाडाखाली अक्षरश: कैऱ्यांचा सडा पडला आहे. त्यामुळे आंब्यांच्या पिकाला मोठे नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या धान पिकांसह भाजीपाला पिकांना सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.