UPI क्रेडिट सर्कलमुळे बँक खात्यात शून्य बॅलन्स असतानाही डिजिटल पेमेंट करणे शक्य होते. या सुविधेअंतर्गत, एका UPI खात्याचा वापर पाच व्यक्ती करू शकतात. पालक आपल्या मुलांच्या खर्चावर लक्ष ठेवू शकतात किंवा छोटे व्यवसाय बिल भरण्यासाठी याचा उपयोग करू शकतात. मुख्य वापरकर्त्याला पेमेंट मर्यादा आणि व्यवहार मंजुरीवर पूर्ण नियंत्रण मिळते.